लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके
आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. वारकरी, ज्येष्ठ नागरिक , मुस्लिम , मातंग सर्वांसाठी ही योजना असल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा, ओबीसी, आदिवासी या सर्वांच्या महामंडळाला पैसे दिले आहेत. लोकसभेला मुस्लिम समाजाने आमच्याकडे पाठ फिरवूनही, मुस्लिम समाजासाठी योजना आणून त्यांना 1 हजार कोटी दिले असून कर्जाची हमी सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
विरोधक केवळ आमच्यावर टीका करतात, ते दुसरं काही करु शकत नाहीत
आता सर्व पाणी उपसण्याची योजना सोलरवर घेत असल्यामुळे शेतकऱ्यांवर लाईट बिल भरण्याचा बोजा येणार नाही. अशा योजना चांगल्या पद्धतीने चालवू असे अजित पवार म्हणाले. यासाठी या बजेटमध्ये हे वीज बिल सोलर पॅनलमध्ये घेवून शेतकऱ्यांना फक्त पाणीपट्टी भरावी लागेल. विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडूण आणा असं आवाहन देखील अजित पवार यांनी जनतेला केलं. केवळ एक वर्ष कळ काढा पुढच्या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांना रात्री नाही तर दिवसा देखील शेतीला वीज मिळू शकेल असे अजित पवार म्हणाले.
सध्या साडेनऊ हजार मीटर मेगा वॅट वीज सोलर वर बनवत आहे. विरोधक केवळ आमच्यावर टीका करत आहेत. ते दुसरं काही करु शकत नाहीत. कुणी टीका केल्यानं आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.